आव्हाड यांनी केली होती अजित पवार यांच्यावर टीका
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा अजितदादांवर टीका केली आहे. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘‘जितेंद्र आव्हाड यांच्या मेंदूला लकवा मारला आहे. जितेंद्र आव्हाड स्वतः महापाकीटमार चोर आहेत. ज्यांना कावीळ झालेली असते, त्यांना जग पिवळे दिसत असते. निवडणुकीला सामोरे जात असतांना तुमच्या मतदारसंघात विकासाचे केलेले एखादे काम जनतेला सांगा. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सगळ्यात मोठे घरभेदी आहेत.’’
अमोल मिटकरी आव्हाडांविषयी म्हणाले, ‘‘जितेंद्र आव्हाड ही कुणाची अवलाद आहेत, हे मी जाहीर भाषणातून मुंब्रा येथे येऊन सांगणार आहे. त्यांच्या गुंडांना त्यांनी सभेत भाषण ऐकण्यासाठी पाठवावे.’’
संघावर टीका केल्याविना त्यांना चैन पडत नाही, असे भाजपचे बावनकुळे यांनी म्हटले आहे, तर मतांच्या लालसेपोटी हे सारे करत असल्याची टीका भाजपचे प्रवीण दरेकर यांनी केली आहे.