नंदुरबार – तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरो गाडीने रस्त्याच्या कडेला ३ मोटारसायकलसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडल्याने ५ जणांचा मृत्यू, तर १ जण गंभीर घायाळ झाल्याची घटना घडली. २ नोव्हेंबरला सायं. साडेसहा वाजता ही घटना घडली आहे.
या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. संतप्त नातेवाइकांनी उपनगर पोलीस ठाणे गाठत संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी करत मृतदेह कह्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले होते.