मुंबई : निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा डाव असल्याचा दावा शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
आमदार शिरसाट पुढे म्हणाले की,
१. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या २ दंगलींचा आढावा घेतला तरी कळेल की, या दंगली सुनियोजित होत्या. विधानसभेच्या निवडणुकीतही असा प्रकार केला जाणार आहे, अशी माहिती आहे. ही निवडणूक सहजासहजीने जिंकू नये, असा त्यामागचा डाव आहे.
२. काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे दंगल उसळली होती. ऑगस्टमध्येही एका व्हिडिओमुळेही तणाव निर्माण झाला होता. धर्मांधांकडून गंगापूर, वैजापूर, खंडाळा येथे टायर जाळून जोरदार निदर्शने करण्यात आली. यामुळे तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली होती.