Waqf Board Land Jihad : शहापूर (बेळगाव) परिसरावरील वक्फ बोर्डाच्या दाव्यावर कायदेशीर लढा देण्याचा नागरिकांचा निर्णय !

नागरिकांना मार्गदर्शन करतांना भाजप आमदार अभय पाटील

बेळगाव : बेळगाव शहरातील सर्व्हे क्रमांक ८ मधील  ५४ एकर १३ गुंठे जागा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत मिळकती असल्याचा आणि त्या जागांची मूळ मालकी येथील शेरखान जुम्मा मशीदची असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर दक्षिणचे भाजप आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरमधील दत्तमंदिर येथे बैठक बोलावण्यात आली होती. त्या संदर्भात त्या भागातील सर्व रहिवाशांना पुढील लढा कशा पद्धतीने लढावा ? त्या संदर्भात आमदार अभय पाटील यांनी मार्गदर्शन केले. यानंतर सर्वांनी या विरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला. या वेळी नगरसेवक नितीन जाधव, गिरीश धोंगडी, राजू भातखंडे, नागरिक महेश पाटील, संजय प्रभु, विनायक हावळानाचे, पवन धोंगडी, नेमिनाथ पाटील, पांडुरंग शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.


यापूर्वीही आनंदवाडी येथील मिळकतीवर वक्फ बोर्ड, तसेच शेरखान जुम्मा मशीद वतीने मालकी हक्काचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात आता पुन्हा नोटीस देण्यात आली आहे. शहापूरच्या म. फुले रोड, मुचंडी मळा, गोकुळनगर आणि आनंदवाडी येथील रहिवाशांना वक्फ बोर्डाकडून नोटीस देण्यात आली आहे. या जागांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

नागरिकांना वक्फ बोर्डाच्या दाव्याच्या विरोधात का लढावे लागत आहे ? केंद्र सरकारने वक्फ बोर्ड आणि कायदा रहित करणे, याच यावरील एकमेव उपाय आहे !