साधकांना आधार देणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रावणी श्रीपाद पेठकर !
‘कु. श्रावणी उन्नत साधक आणि संत यांच्याशी सहजतेने अन् आदराने बोलतात. त्या वयस्कर आणि समवयस्क व्यक्ती अन् लहान मुले यांच्याशी आपुलकीने बोलतात. त्या कधीही कुणाच्या मनाला लागेल, असे बोलत नाही.