पुणे, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – गेल्या काही महिन्यांपासून आपल्या राज्यात आणि देशात निर्माण झालेले वातावरण अन् सामाजिक अस्वस्थता हे देशाच्या, समाजाच्या, तसेच धर्म, संत-महंत यांच्या धर्मकार्य आणि सेवा कार्यामध्ये बाधा निर्माण करतांना दिसत आहे. या समस्येचे सर्वांगीण चिंतन करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी सर्व पंथांचे साधू, संत, महंत, कीर्तनकार, आध्यात्मिक प्रमुख, मठाधिपती आणि विचारवंत या सर्वांना एकत्र करणार्या ‘संत संगम’ या कार्यक्रमाचे २७ ऑक्टोबर या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने पुणे आणि सातारा येथे आयोजन करण्यात आले होते. स.प. महाविद्यालय, टिळक रस्ता, पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या’चे कोषाध्यक्ष प.पू स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी मार्गदर्शन केले. सद्गुरु श्री सेवागिरी संस्थान पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील कार्यक्रमात विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे धर्माचार्य संपर्क प्रमुख ह.भ.प. माधवदास महाराज राठी (नाशिक) यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मतदान करतांना आपण सावध झालो नाही, तर आपली मंदिरेही नष्ट होतील ! – ह.भ.प. माधवदास महाराज राठी (नाशिक)
हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेत नसेल, तर संतांना त्यांच्या गडावरून दूर केले जाईल. ‘वक्फ बोर्ड’ या गडावरही हक्क सांगतील. या देशात मदरशामधून ख्रिस्ती शाळांमधून त्यांच्या धर्माचे शिक्षण दिले जाते; मात्र हिंदु धर्माचे शिक्षण देणे गुन्हा मानला जातो. १८ प्रकारच्या जिहादांमध्ये हिंदू गुरफटला गेला आहे. आपण आपल्या संतांविषयी किती चांगले बोलतो ? आपण अभंग सांगतांना आपल्या धर्माविषयी काही वेळ आपण बोलले पाहिजे, धर्मशिक्षण दिले पाहिजे. सर्वांनी १०० टक्के मतदान केले पाहिजे. या वेळी मतदान करतांना आपण सावध झालो नाही, समाजाला जागृत केले नाही, तर आपली मंदिरेही नष्ट होतील. ‘एक रहोगे तो नेक राहोगे’, ‘बटेंगे तो कटेंगे’ ! काश्मीर मधील निवडणुकीनंतर प्रतिदिन सैनिकांवर आक्रमण चालू झाले आहे. यापुढचा मुख्यमंत्री संत असावा, असा विचार आपण का करत नाही ?