मीरा-भाईंदर येथील सरकारी भूमीवर अतिक्रमण करून अवैध दर्गा बांधल्यामुळे न्यायालयाने महानगरपालिकेस फटकारले !

सरकारी भूमीवर दर्गे कसे उभे रहातात ? याला कारणीभूत असणार्‍या भ्रष्टांवर तातडीने कारवाई व्हायला हवी !

भंडारा येथे एस्.टी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची सभा उधळली !

एस्.टी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची ७१ वी सभा अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी येथे आयोजित केली होती. ही सभा एस्.टी कामगार कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी उधळली. सभेत आसंद्या तोडण्यात आल्या, तसेच पोलिसांवरही आसंद्या फेकण्यात आल्या.

‘सागरी किनारा स्वच्छता’ अभियान ही सवय व्हावी ! – सी.पी. राधाकृष्णन्, राज्यपाल

प्रत्येक मोठ्या कार्याचा प्रारंभ लहान गोष्टींतूनच होतो. सागरी किनारा स्वच्छतेच्या जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेचा प्रारंभ मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

बदलापूर येथील विद्यार्थिनीवर अत्याचार केले ! – अक्षय शिंदे

बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याने वैद्यकीय पडताळणीच्या काळात आधुनिक वैद्यांसमोर गुन्ह्यातील सहभाग मान्य केला. विशेष तपास पथकाने या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण केले आहे.

पुणे येथील राज्यस्तरीय धर्मचिंतन बैठकीत वक्फ बोर्डासंबंधीच्या पुस्तिकांचे प्रकाशन !

पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय धर्मचिंतन बैठकीत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या हस्ते या वेळी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. समाजजागृती आणि राज्यघटनेच्या मूल्यांचा जागर या पुस्तिकांमध्ये करण्यात आला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे: तिकीट निरीक्षकाला हॉकी स्टिकने मारहाण !…१ लाखांची लाच घेतांना ग्रामविस्तार अधिकारी अटकेत !….

समाजातील दिवसेंदिवस वाढणारी हिंसक वृत्ती धोकादायक !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु राष्ट्राची शपथ घेतली होती ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कथेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे २० सप्टेंबरला झालेल्या मार्गर्शनात ते बोलत होते. ‘शिवसंस्कार’ या विषयावर बोलतांना त्यांनी छत्रपती शिवरायांचे बालपण, स्वराज्याची शपथ आणि त्या काळातील संतकार्य आदींवर विवेचन केले.

पुणे जिल्ह्यातून १४ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा हस्तगत !

जिल्ह्यातून ५ लाख १९ सहस्र ४३८ रुपयांचा, तर शहरातून ९ लाख १९ सहस्र ५२० रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ हस्तगत करण्यात आले.

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानवधाचे शिल्प त्वरित बसवावे ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

अशा मागणीचे निवेदन ‘श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक, हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ सप्टेंबर या दिवशी दिले.

घराणेशाहीतून येणार्‍यांना मतदान न केल्यास ते एक मिनिटात सरळ होतील ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. २१ सप्टेंबर या दिवशी आयुर्वेदावर आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.