क्रिकेटपटूंना पहाण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर !

क्रिकेटपटूंनी भारताला ‘विश्वचषक’ मिळवून दिला, याचा अभिमान आहेच; परंतु राष्ट्रासमोर आतंकवाद, नक्षलवाद, बलात्कार इतक्या भीषण समस्या असतांना लाखो युवकांनी त्यांच्या स्वागतासाठी वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणे अयोग्यच !

सातारा जिल्ह्यात ‘केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथका’चे आगमन !

जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे नेहमीच दुर्घटना घडत असतात. दुर्घटनांना प्रतिसाद देण्यासह बचावकार्य पार पाडण्यासाठी ‘केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथका’चे सातारा येथे आगमन झाले आहे.

तावडे हॉटेल उड्डाणपूल ते उंचगाव उड्डाणपूल या मार्गावरील वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी वाहतूक दिवे चालू करा !

तावडे हॉटेल उड्डाणपूल ते उंचगाव उड्डाणपूल या मार्गावर पोलिसांच्या सूचनेनुसार वाहतूक दिव्यांची यंत्रणा काही वर्षांपूर्वी बसवण्यात आली होती. यानंतर अचानक ही यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे. सध्या ही यंत्रणा बंद असल्याने दोन्ही उड्डाणपुलांखाली मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.

ललित पाटील याला पसार होण्यास साहाय्य करणारे २ पोलीस हवालदार बडतर्फ !

पुणे – अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील याला ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तून पसार होण्यास साहाय्य करणार्‍या पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. या प्रकरणी पोलीसदलातील काही कर्मचारी आणि अधिकारी यांचे निलंबन करण्यात आले होते. अन्वेषणामध्ये दोषी आढळून आलेल्या २ जणांवर कारवाई केली. … Read more

सकल हिंदु समाजाच्या वतीने किवळे येथे रस्ता बंद आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्या सन्मानार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

मुंबईला अदानींपासून वाचवा ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा उद्योगपती अदानी यांच्या घशात घातली आहे.

११ जुलै या दिवशी झाडाणी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी !

महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील ६४० एकर जमीन स्थानिक शेतकर्‍यांना फसवून आयुक्त वळवी आणि त्यांचे नातेवाईक यांनी घेतली आहे, अशा अनेक तक्रारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.

‘सगेसोयरे’च्या विरोधातील याचिकेत तथ्य नाही ! – राज्य सरकारचा न्यायालयात युक्तीवाद

मराठा समाजातील सगेसोयर्‍यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, या मागणीसह प्रविष्ट केलेल्या याचिकेत तथ्य नाही. त्या याचिका फेटाळून लावण्यात याव्यात

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘पालखी मार्गावर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक मंगल कार्यालये, उपाहारगृहे यांचे साहाय्य घेतले जाणार आहे. तात्पुरत्या शौचालयांचीही उभारणी करण्यात आली आहे.”

जैन आचार्य विराग सागर महाराज यांचा देहत्याग  !

विराग सागर महाराज यांनी १०८ दिवसांचा पायी प्रवास करून ते सिंदखेडराजा येथे पोचले होते. मध्यरात्री दीड वाजता उठून त्यांनी साधना केली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी देहत्याग केला.