सकल हिंदु समाजाच्या वतीने किवळे येथे रस्ता बंद आंदोलन

किवळे (जिल्हा पुणे) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्या सन्मानार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. महापुरुषांच्या विटंबनेच्या प्रकरणी १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा देणारा कायदा संमत करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे घडलेला अपप्रकार सामाजिक बंधुतेला काळीमा फासणारा आणि सकल हिंदूंचा अपमान करणारा आहे. त्याचा निषेध करण्यासाठी, तसेच सामाजिक शांतता आणि सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल किवळे येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागाने आंदोलन करण्यात आले.