अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी यांचे राज्य परिवहन मंडळाच्या बँकेतील संचालकपद रहित

सदावर्ते चुकीचा कारभार करत असल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सदावर्ते यांनी नियम मोडल्याचे निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या वेळी ते म्हणाले की, शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा राजकीय भूमिका बदलल्या, पक्ष तयार केले आणि पुन्हा काँग्रेसमध्येही गेले. आता पुन्हा एकदा त्यांनी तसेच संकेत दिले आहेत.

Loksabha Elections 2024 : गोव्यात ७६.०६ टक्के विक्रमी मतदान ! – रमेश वर्मा, मुख्य निवडणूक अधिकारी

हा आकडा वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत थोडासा अधिक आहे. ७ मे या दिवशी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात ७७.६९ टक्के, तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात ७४.४७ टक्के मतदान झाले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापकांवर गुन्हा नोंद !

वेल्हा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. ती ६ मे या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत चालू होती.

निवडणुकीच्या संदर्भातील छायाचित्रे, ध्वनीचित्रीकरण समाजमाध्यांवर प्रसारित करणार्‍यांवर गुन्हे नोंद !

इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक २१ आणि २५३ मतदान केंद्र येथे एकाने भ्रमणभाष केंद्रात नेण्यास बंदी असतांना त्याच्यासह आत प्रवेश करून चित्रीकरण केले.

मुंबईत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रोकड आणि अवैध मद्य जप्त !

निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सर्वत्र होणारे अपप्रकार व्यवस्थेचे अपयश दर्शवतात !

महाराष्ट्रात मे महिन्यात अवेळी पावसाचा जोर वाढणार !

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात ११ मेपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज नोंदवला आहे.

पोलिसांचा खबर्‍या असल्याच्या संशयावरून पुणे येथे एका ज्येष्ठ नागरिकावर आक्रमण

पोलिसांचा खबर्‍या असल्याच्या संशयावरून एका गुंड टोळक्याने एका ज्येष्ठ व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. घटना हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

१० मे या दिवशी श्री परशुराम जयंतीच्या निमित्त ब्राह्मण संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम आणि शोभायात्रा !

वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच १० मे या दिवशी श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर येथील १६ ब्राह्मण संस्थांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे प्रथमोपचार शिबिर पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी प्रथमोपचार शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.