कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काही जणांनी ‘इ.व्ही.एम्.’ यंत्राचे, तसेच प्रत्यक्ष मतदान करतांनाची छायाचित्रे, ध्वनीचित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित केली. यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक २१ आणि २५३ मतदान केंद्र येथे एकाने भ्रमणभाष केंद्रात नेण्यास बंदी असतांना त्याच्यासह आत प्रवेश करून चित्रीकरण केले. (या वेळी पोलीस आणि अधिकारी काय करत होते – संपादक) हे चित्रीकरण करून ते ‘इन्स्टाग्राम अकाऊंट’वर प्रसारित केले. या प्रकरणी मतदान केंद्राध्यक्षांच्या तक्रारीनंतर संबंधित तरुणावर गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालादांच्या तक्रारीनंतर त्याच्यावर शहापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कोल्हापूर शहर येथेही ‘वीरधवल’ नावाच्या ‘इन्स्टाग्राम अकाऊंट’वर मतदान करतांनाचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाल्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यात ५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.