हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे प्रथमोपचार शिबिर पार पडले !

प्रथमोपचार शिबिरात सहभागी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू

जळगाव, ८ मे (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी प्रथमोपचार शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जळगाव ‘अँनेस्टेटीस्ट असोसिएशन’च्या वतीने डॉ. अमित हिवरकर, डॉ. सपना दातार यांनी जमलेल्या सर्व शिबिरार्थींना ‘जीवित रक्षणासाठी करावयाच्या कृती’ या अंतर्गत अतिशय सहज सोप्या शब्दांमध्ये प्रथमोपचार प्रात्यक्षिके शिकवली. प्रात्यक्षिक सर्व शिबिरार्थींना समजायला सोपे जावे म्हणून ‘डमी’चा वापर केला गेला. या शिबिराचा लाभ जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, यावल, सावदा आणि जळगाव येथील धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी घेतला.