पोलिसांचा खबर्‍या असल्याच्या संशयावरून पुणे येथे एका ज्येष्ठ नागरिकावर आक्रमण

पुणे – पोलिसांचा खबर्‍या असल्याच्या संशयावरून एका गुंड टोळक्याने एका ज्येष्ठ व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. घटना हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

पंजाबसिंह कल्याणी (वय ६५ वर्षे) असे घायाळ झालेल्याचे नाव आहे. ६ मे या दिवशी रात्री पंजाबसिंह कल्याणी रामटेकडी परिसरात घरासमोर थांबले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. पोलिसांना दरोडा टाकल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप करून त्यांनी पंजाबसिंग यांच्यावर तलवारीने आक्रमण केले. त्या वेळी पंजाबसिंग यांचा नातू धनराजसिंग याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्याच्या हातावर तलवारीने वार केला.