लांजा (जि. रत्नागिरी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २ मे या दिवशी येथील शहनाई हॉल या ठिकाणी सकाळी ११ वाजता महायुतीची प्रचारसभा होणार असून या सभेत केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचे भाषण होणार आहे.
या सभेला नारायण राणे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, शिवसेना नेते किरण सामंत, तसेच भाजपचे लोकसभा संयोजक आणि माजी आमदार प्रमोद जठार, विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आर्.पी.आय. या पक्षांचे जिल्हाध्यक्ष अन् तालुकाध्यक्ष उपस्थित रहाणार आहेत.