
कोल्हापूर – २९ एप्रिलला रुईकर कॉलनी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ एका मुसलमान व्यक्तीने नमाजपठण केले. या संदर्भातील एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. अशा घटनांमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते. तरी या संदर्भात आम्ही शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून रुईकर कॉलनी येथे असलेल्या मूर्ती परिसरात ‘सीसीटीव्ही’ बसवावे, असे निवेदन शिवप्रेमींच्या वतीने कोल्हापूर महापालिकेत देण्यात आले. या वेळी सर्वश्री संदीप कुंभार, अक्षय पाटील, गौरव वरुटे, अनिकेत अतिग्रे, सौरभ निकम, प्रसाद सागावकर यांसह अन्य उपस्थित होते.
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी ‘या परिसरात त्वरित सी.सी.टी.व्ही. बसवण्याचे काम चालू करत आहोत’, असे पत्रकारांना सांगितले.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या कामाची पहाणी !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार