मुंबई – दक्षिण मुंबईमध्ये लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी शिवसेनेच्या आमदार सौ. यामिनी जाधव यांना देण्यात आली आहे. वर्ष २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी ‘एम्.आय्.एम्.’चे विद्यमान आमदार वारिस पठाण यांचा पराभव केला होता. सौ. यामिनी जाधव यांचे यजमान यशवंत जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या काही कामांच्या कंत्राटाप्रकरणी यशवंत जाधव याची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वेगळे झाल्यावर यशवंत जाधव यांनी काही कालावधीनंतर एकनाथ शिंदे यांना साथ दिली. दशिक्ष मुंबईतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत हे आहेत. या मतदारसंघातील लढत या दोघांमध्ये होण्याची शक्यता आहे.