कात्रज येथे आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू !
कात्रज परिसरात ‘फॉरेन सिटी प्रदर्शना’मध्ये वडिलांसोबत गेलेल्या गणेश पवार या ८ वर्षांच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत् पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.