पुणे येथे भरारी पथकाने केली ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन शासनाधीन !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथक आणि भरारी पथक यांनी दोन घटनांमध्ये अनुमाने ६५ लाख रुपयांची रोकड आणि एक वाहन शासनाधीन केले आहे. आचारसंहिता काळात ५० सहस्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगता येत नाही.

भोसरी एम्.आय.डी.सी. परिसरातील पोलीस ठाण्याजवळ १३ लाख ९० सहस्र रुपयांची रोख रक्कम आणि ३० लाख रुपये किमतीचे वाहन शासनाधीन केले; तर दुसर्‍या घटनेत शिरूर नगर परिषद क्षेत्रातील कमान पुलाजवळ खासगी वाहनातून ५१ लाख १६ सहस्र रुपयांची रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच भरारी पथकातील कर्मचार्‍यांनी प्राप्तीकर विभागाला अवगत केले. (पकडण्यात आलेली रक्कम एवढी आहे, तर जप्त न झालेली केवढी असेल ? निवडणूक म्हणजे पैसे वाटण्याची प्रक्रिया झाली आहे. – संपादक)