राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे खरे स्वरूप दाखवणार्‍या ‘दगाबाज’ या पुस्तकाचे प्रकाशन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सत्तेचा वापर करून, तसेच विरोधकांशी असलेली मैत्री आणि प्रसारमाध्यमे यांचा चाणाक्षपणे वापर करून स्वतःची काळी बाजू लपवली आहे. त्यांचे खरे स्वरूप जनमानसासमोर आणण्याचा प्रयत्न मी केला आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रकमधून ५० गायींची तस्करी !

वर्धा येथून एक ट्रक संशयास्पदरित्या समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि तो पकडला. पोलिसांनी ट्रकची पडताळणी केल्यावर त्यात ५० हून पेक्षा अधिक गायी आढळल्या.  

‘मोनालिसा’च्या जगप्रसिद्ध तैलचित्रावर २ महिलांनी केले आक्रमण !

लिओनार्डो दा विंची या प्रसिद्ध चित्रकाराने काढलेल्या ‘मोनालिसा’च्या जगप्रसिद्ध तैलचित्रावर दोन महिलांनी आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला असून त्यात या महिला पॅरिसमधील लूवर संग्रहालयात असलेल्या चित्रावर सूप फेकतांना दिसत आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक ! – विजय शर्मा, उपमुख्यमंत्री, छत्तीसगड

ज्याप्रमाणे जगभरातील ज्यूंनी इस्रायल बनवण्याचा संकल्प केला, त्याचप्रमाणे हिंदूही त्यांचा संकल्प विसरलेले नाहीत. आज श्रीराममंदिर साकार झाले आहे. पुढचा संकल्पही निश्‍चितपणे पूर्ण होईल !

आध्यात्मिक बळावरच हिंदु राष्ट्र स्थापन होणार ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद आणि अन्य समस्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. त्याचसमवेत प्रत्येक हिंदूने ‘स्वसंरक्षण कसे करावे ?’, हे शिकले पाहिजे.

पुणे जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळीची यशस्वी सांगता !

राष्ट्रध्वजाची  विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या २१ वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या चळवळीद्वारे प्रबोधन करत आहे. या चळवळीच्या अंतर्गत पुणे, पिंपरी, चिंचवड ,नाशिक रोड,जुन्नर, तळेगाव,सासवड येथील ५५ हुन अधिक शाळांमध्ये  निवेदन  दिले.

सातारा येथील प्रशासन, पोलीस आणि शाळा, महाविद्यालये यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शहरांत, तालुक्यांत, गावांत प्रशासन, पोलीस, तसेच शाळा आणि महाविद्यालयात निवेदन देण्यात आले.

इलेक्ट्र्रिक रिक्शांसाठीच्या अनुदान योजनेकडे रिक्शाचालकांनी फिरवली पाठ !

अनुदान घोषित करतांना अभ्यास केला जात नाही का ? रिक्शाचालकांना पुरेशाप्रमाणात रक्कम न देता अनुदान घोषित करून काय उपयोग ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

गंगावेस तालीम सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी सर्व सुविधा देणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, अनेक तालीम बांधल्या. यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत. हीच परंपरा कायम रहाण्यासाठी तालमींमध्ये वस्ताद आणि मल्ल यांना सर्व सुविधा असणार्‍या तालीम बनवणे आवश्यक आहे.

जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा धर्मविजय निश्चित आहे ! – पराग गोखले, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

केवळ जिहादी आतंकवाद हे आपल्यापुढचे संकट नाही, तर बॉलीवूड जिहाद, ‘अर्बन नक्षलवाद’ हेही तितकेच गंभीर आणि व्यापक आहे. आम्हा हिंदूंचा इतिहास शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. हिंदु धर्मावर कितीही आघात झाले, तरी हा धर्म संपुष्टात आला नाही आणि भविष्यातही येणार नाही.