‘मोनालिसा’च्या जगप्रसिद्ध तैलचित्रावर २ महिलांनी केले आक्रमण !

पॅरिस (फ्रान्स) – लिओनार्डो दा विंची या प्रसिद्ध चित्रकाराने काढलेल्या ‘मोनालिसा’च्या जगप्रसिद्ध तैलचित्रावर दोन महिलांनी आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला असून त्यात या महिला पॅरिसमधील लूवर संग्रहालयात असलेल्या चित्रावर सूप फेकतांना दिसत आहेत. चित्रावर ‘बुलेटप्रूफ’ काच असल्यामुळे या चित्राची हानी झाली नाही. या महिला पर्यावरणवादी कार्यकर्त्या असून त्यांना या प्रकरणी कह्यात घेतले असता त्यांनी हे कृत्य मुद्दामहून केल्याचे सांगितले.

सौजन्य civic mirror 

या महिलांनी ‘कला कि निरोगी आणि योग्य अन्नप्रणाली ?’, यांमध्ये महत्त्वाचे काय आहे ?’, असा प्रश्‍न या दोघांनी सरकार, तसेच प्रशासनाला विचारला आहे.  फ्रान्समधील कृषी व्यवस्था कोलमडली असून शेतकरी काम करतांना मरत आहेत. त्यामुळे पर्यावरण, तसेच अन्न स्रोतांची आवश्यकता अधोरेखित व्हावी, यासाठी आम्ही हे कृत्य केले.

इंधनाच्या वाढत्या किमती आणि धोरणांमध्ये झालेले पालट यांचा निषेध करत  काही शेतकर्‍यांनी फ्रान्समध्ये नुकतीच निदर्शने केली होती.