बक्सर (बिहार) येथे रेल्वे गाडी रुळावरून घसरल्याने ४ प्रवाशांचा मृत्यू : ८० जण घायाळ

टूरीगंजे ते रघुनाथपूर या मार्गावर हा अपघात झाला. या ठिकाणी आता बचावकार्य चालू करण्यात आले आहे. घायाळ प्रवाशांना पाटलीपुत्र येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही रेल्वे देहलीहून आसाममधील कामाख्या येथे चालली होती.

Israel Offensive : इस्रायलकडून आता सीरियाच्या विमानतळांवरही आक्रमण

या आक्रमणाच्या प्रकरणी सीरियाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी इराणने रशियाकडे साहाय्य मागितल्याचे सांगण्यात येत आहे.

Life Skills Course : देशभरातील महाविद्यालयांत चालू होणार ‘जीवन कौशल्य अभ्यासक्रम’ !

केंद्रशासनाने युवा पिढीची स्थिती पाहून अशा प्रकारचा अभ्यासक्रम आणला, हे स्तुत्य पाऊल आहे. यासह युवा पिढीला साधना शिकवून तिच्याकडून ती करून घेतली, तर तिच्या जीवनातील अनेक समस्या ती स्वत: सोडवण्यास सक्षम बनेल !

दगडफेक करणार्‍या आरोपींना दांडक्याने मारणे, हा छळ मानण्यात येऊ नये !  – गुजरात पोलीस

गुजरातच्या खेडा जिल्ह्यात गेल्या वर्षी काही मुसलमानांना दगडफेक केल्याच्या प्रकरणी पकडून त्यांच्या पार्श्‍वभागावर दांडक्याने मारहाण करण्यात आली होती. ‘या मारहाणीच्या घटनेला छळ म्हणण्यात येऊ नये’, असे या प्रकरणातील ४ पोलीस अधिकार्‍यांनी गुजरात उच्च न्यायालयात म्हटले.

खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्ला याच्या २ साथीदारांना देहलीत अटक

देहली पोलिसांनी खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्लाच्या  जवळच्या २ साथीदारांना येथे अटक केली. हे दोघे आरोपी पंजाबमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या सिद्धतेत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि हातबाँब जप्त केले आहेत.

इस्रायल हे आमचे केवळ पहिले लक्ष्य, संपूर्ण जग शरीयतच्या कक्षेत असेल ! – हमास

ही आहे धर्मांध जिहाद्यांची खरी मानसिकता !

हमासला चिरडून टाकू ! – पंतप्रधान नेतान्याहू यांचा निर्धार

आम्ही असंख्य इस्रायली मुला-मुलींचे मृतदेह भूमीवर पडलेले पाहिले आहेत. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. असंख्य महिला आणि पुरुष यांना जिवंत जाळून मारण्यात आले. तरुण इस्रायली महिलांवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

इस्रायलमध्ये स्थापन करण्यात आले ‘एकता सरकार’ !

इस्रायल सरकारने हमासविरुद्ध चालू असलेल्या युद्धावर लक्ष ठेवण्यासाठी ‘एकता सरकार’ (युनिटी गव्हर्नमेंट) आणि ‘युद्ध मंत्रीमंडळ’ यांची स्थापना केली. या नव्या सरकारमध्ये विरोधी पक्षांचाही समावेश करण्यात आला आहे.

मणीपूर येथील म्यानमार सीमेवर सरकार १०० किमी लांबीचे कुंपण घालणार

कुंपण घातल्याने म्यानमारमधून होणारी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबेलच, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी सर्तकतही रहावे लागणार !

पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडमधून घेतले आदि कैलास पर्वताचे दर्शन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी उत्तराखंडमधील पिथौरागड येथील आदी कैलास पर्वताचे दर्शन घेतले. येथेच पार्वती कुंड आहे. पंतप्रधान मोदी यांनी येथे पूजा केली. येथून चीनची सीमा अवघ्या २० किमी अंतरावर आहे.