युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी ६ संशयितांना अटकेत ! 

या प्रकरणी ६ संशयितांना अटक करण्यात आली असून ४ जण फरार आहेत. या खुनाच्या घटनेत संशयितांनी वापर केलेला कोयता, चॉपर, दोन स्टील रॉड आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. 

विविध नेत्यांनी केलेल्या ‘हेट स्पीच’च्या विरोधात मिरज आणि जयसिंगपूर येथील पोलीस ठाण्यांत तक्रार प्रविष्ट !

सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) मिरज आणि जयसिंगपूर या दोन्ही गावांतील शहर पोलीस ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. 

एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार !

‘मानवाचा जन्म का झाला ? जन्मापूर्वी तो कुठे होता ? मृत्यूनंतर तो कुठे जातो ? इत्यादी विषयांची थोडीफारही माहिती नसणारे पाश्‍चात्त्य आणि साम्यवादी मानवजातीचे प्रश्‍न कधी सोडवू शकतील का ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरेच नव्हे, तर त्यांतील अशुभ कसे टाळायचे, हे ज्ञात असलेला एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विधीमंडळांचे हिवाळी अधिवेशन केवळ १० दिवस असण्याची शक्यता !

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार हे अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत येथे होईल. प्रतिवर्षी हे अधिवेशन शुक्रवारी संपते; पण यंदा ते बुधवारी म्हणजे २० डिसेंबर या दिवशी संपणार असल्यामुळे अधिवेशन अवघ्या १० दिवसांचे असण्याची शक्यता आहे.

Goa : कवळे येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा मंदिरातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली भेट !

कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांची भेट दिली.

‘पतंजली योगपीठ हरिद्वार’कडून अमरावती येथील रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांचा सत्कार !

पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्याकडून अमरावती येथे नुकतेच प्रांतीय महिला महासंमेलन घेण्यात आले. त्यामध्ये पू. आचार्या डॉ. साध्वी देवप्रियाजी यांनी महिलांनी आयुष्यात विविध भूमिका पार पाडत असतांना आदर्श कसे रहावे ? याविषयी इतिहासातील उदाहरणे देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले

आपल्याला देवीचे भक्त होऊन आर्ततेने आशीर्वाद मागावा लागेल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री दुर्गामातेच्या चरणी आपण जे येतो ते व्यक्तीगत उत्कर्षासाठी काही मागणे मागण्यासाठी नाही, तर भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्याची शक्ती या देशाला यावी, यासाठी माझे आयुष्य पणाला लावून काम करण्याची इच्छा आहे.

देवद गाव येथे श्री दुर्गामाता दौड पार पडली !

दौडीमध्ये ‘पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !’,  ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो !’, ‘श्री दुर्गादेवीचा विजय असो’, असे विविध वीरश्रीयुक्त जयघोष करण्यात आले.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील पूजा !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सप्तमीला सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती.