नमाजपठण करायचे असेल, तर मशिदीमध्ये जा !

रस्त्यांवर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती नमाजपठण करून नागरिकांना बाधा निर्माण करण्यावरही न्यायालयाने आदेश द्यावा, असेही जनतेला वाटते !

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या खलिस्तानविरोधी शीख व्यक्तीला ठार मारण्याच्या धमक्या !

खलिस्तानचा उघडपणे विरोध करणारे शीख भारतातही अल्प प्रमाणात दिसून येत असतांना लंडनमध्ये अशा प्रकारचा विरोध करणार्‍या शीख व्यक्तीचे अभिनंदनच करायला हवे !

देहलीतील जे.एन्.यू. विश्‍वविद्यालयात लिहिण्यात आल्या भगवा ध्वज आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा !

जे.एन्.यू. विश्‍वविद्यालयातील हिंदुद्वेषी विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करून या विश्‍वविद्यालयाची शुद्धी करण्यात यावी, असेच प्रत्येक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांना वाटत असल्यामुळे केंद्र सरकारने यासाठी पावले उचलावीत !

पाकमधून सौदी अरेबियामध्ये भीक मागण्यासाठी जाणार्‍या १६ पाकिस्तान्यांना विमानातूनच उतरवले !

यथा राजा तथा प्रजा ! आता अन्य देशांकडे भीक मागण्यासाठी जाणार्‍या पाकच्या राज्यकर्त्यांनाही अशा प्रकारे विमानातून उतरवण्याचे धाडस दाखवण्यात येईल का ?

तुर्कीयेच्या संसदेजवळ आत्मघाती बाँबस्फोट : २ आतंकवादी ठार

अंकरा येथे संसदेजवळ १ ऑक्टोबरला सकाळी आत्मघाती बाँबस्फोट घडवण्यात आला. यात बाँबस्फोट घडवणारा आतंकवादी ठार झाला, तर दुसर्‍या आतंकवाद्याला सुरक्षादलांनी गोळ्या घालून ठार मारले.

मणीपूरमधील हिंसाचारामागे बांगलादेश आणि म्यानमार येथील आतंकवादी संघटना  ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची माहिती

आता सरकारने या माहितीच्या आधारे या देशांतील सरकारांकडे आतंकवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी करावी. त्यांनी कारवाई केली नाही, तर भारताने या देशांत जाऊन स्वतः कारवाई करून मणीपूर शांत करावे !

स्कॉटलंड येथे भारतीय उच्चायुक्तांना खलिस्तान्यांनी गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखल्याच्या घटनेचा गुरुद्वाराकडून निषेध !

केवळ निषेध करून गुरुद्वाराने थांबू नये, तर खलिस्तानांचा रस्त्यावर उतरून विरोध करावा !

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची देशभरात ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी ! – जगन्नाथ सराका, कायदामंत्री, ओडिशा

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची ओडिशा आणि अन्य ६ राज्ये येथे ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी आहे, अशी माहिती ओडिशाचे कायदामंत्री जगन्नाथ सराका यांनी विधानसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

आतंकवादी हाफिझ सईद याच्या सहकार्‍याची पाकिस्तानमध्ये हत्या

लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफिझ सईद याचा जवळचा सहकारी मुक्ती कैसर फारूख याची कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

खलिस्तानी कॅनडामध्ये भारताविरुद्ध मोर्चा काढणार !

यातून लक्षात येते की, कॅनडातील सरकार खलिस्तान्यांना अद्यापही मोकळीकच देत आहे. भारताने आता कॅनडावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा !