स्कॉटलंड येथे भारतीय उच्चायुक्तांना खलिस्तान्यांनी गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखल्याच्या घटनेचा गुरुद्वाराकडून निषेध !

लंदन (ब्रिटन) – स्कॉटलंड येथे भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरईस्वामी यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून खलिस्तान्यांनी रोखल्यामुळे त्यांना परत जावे लागले. गुरुद्वाराने एका निवेदनाद्वारे या घटनेचा निषेध केला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गुरुद्वारा सर्व धर्मियांसाठी उघडा आहे. आम्ही आमच्या सिद्धांतानुसार सर्वांचे गुरुद्वारामध्ये स्वागत करतो.

भारताने ब्रिटन सरकारकडे हे प्रकरण उपस्थित करून भारताच्या अधिकार्‍यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. यावर सरकारकडून घटनेकडे गांभीर्याने पहात असल्याचे सांगण्यात आले आहे. (ब्रिटन सरकार खरेच गंभीर असते, तर अशी घटना घडली नसती ! ब्रिटनकडून खलिस्तान्यांच्या संदर्भात मवाळ धोरण राबवले जात असल्याने खलिस्तानी उद्दाम झाले आहेत ! – संपादक) या घटनेविषयी स्कॉटलंड पोलिसांनी सांगितले की, आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत.

संपादकीय भूमिका 

केवळ निषेध करून गुरुद्वाराने थांबू नये, तर खलिस्तानांचा रस्त्यावर उतरून विरोध करावा !