तुर्कीयेच्या संसदेजवळ आत्मघाती बाँबस्फोट : २ आतंकवादी ठार

अंकरा (तुर्किये) – येथे संसदेजवळ १ ऑक्टोबरला सकाळी आत्मघाती बाँबस्फोट घडवण्यात आला. यात बाँबस्फोट घडवणारा आतंकवादी ठार झाला, तर दुसर्‍या आतंकवाद्याला सुरक्षादलांनी गोळ्या घालून ठार मारले. तुर्कीयेकडून या घटनेला ‘आतंकवादी आक्रमण’ असे म्हणण्यात आले आहे. यात स्फोटामध्ये २ सुरक्षारक्षक घायाळ झाले. आतंकवादी एका वाहनातून येथे पोचले होते.