पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची देशभरात ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी ! – जगन्नाथ सराका, कायदामंत्री, ओडिशा

भुवनेश्‍वर (ओडिशा) – पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची ओडिशा आणि अन्य ६ राज्ये येथे ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी आहे, अशी माहिती ओडिशाचे कायदामंत्री जगन्नाथ सराका यांनी विधानसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. यायतील ओडिशाच्या ३० पैकी २४ जिल्ह्यांमध्ये ६० सहस्र ४२६ एकर भूमी आहे, तर अन्य ६ राज्यांत ३९५ एकर भूमी आहे. जगन्नाथ मंदिर प्रशासनाकडे राज्यातील भूमीची नोंदणी आहे. या भूमींवर झालेली अतिक्रमणे हटवण्यासाठी ९७४ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.