पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे श्री गणेशमूर्ती विक्री दुकानांना परवाना नसल्यास उपायुक्तांची कारवाईची चेतावणी !

आतापर्यंत महापालिकेकडे १९३ अर्ज आले आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याविना मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे.

नवी मुंबई येथे अमली पदार्थ विकणार्‍या ६ नायजेरियन महिला कह्यात !

नवी मुंबईत अवैधरित्या रहाणार्‍या विदेशी नागरिकांच्या विरोधात सर्वत्र धाडी घालण्यात येत आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाल्यासच  अमली पदार्थ विक्रीचे समूळ उच्चाटन होईल !

नाशिक येथे २ ठिकाणच्या धाडीत ५९ सहस्र रुपयांचा भेसळीचा माल जप्त !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळ करणार्‍यांवर कायमस्वरूपी कारवाई केली, तरच भेसळीचे प्रकार थांबतील !

वणी (यवतमाळ) येथे गोवंशियांच्या मांसविक्री प्रकरणी ३ धर्मांधांना अटक !

कायद्याची तीळमात्रही भीती नसलेले धर्मांध आणि गोवंश हत्याबंदीची कठोर कारवाई करण्यास कचरणारे पोलीस प्रशासन यांमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अनधिकृत फलक हटवण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गल्लीबोळातील कचर्‍यावरून महापालिका प्रशासनाला खडसावल्यानंतर आता स्वच्छतेसमवेतच अनधिकृत फलक हटवण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम घेण्याचे महापालिकेने ठरवले आहे. 

भांडुपमधील ६४ बांधकामे हटवली !

भांडुप येथील भट्टीपाडा चौकातील रस्ता रूंदीकरणासाठी अडथळा ठरणारी ६४ बांधकामे मुंबई महानगरपालिकेने हटवली आहेत. ४० वर्षे जुनी बांधकामे हटवल्याने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमीष दाखवून फसवणूक !

‘ए.आर्. हॉलिडेज’ आस्थापनाचे प्रमुख अमित राणा यांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस तपासणी नाकी मलिदा खाण्यासाठीच आहेत का ? – बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष, सावंतवाडी

गोवा येथे हत्या करून तरुणीचा मृतदेह चारचाकीतून आंबोली येथे आणून घाटात फेकला जातो, याची कल्पना गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील पोलिसांना नाही; मग अहोरात्र बांदा ते आंबोली या रस्त्यावर असणारे वाहतूक पोलीस झोपा काढत होते का ?

व्याघ्रक्षेत्राबाहेरील बफर झोनचा वापर शेतीकरता करता येईल ! – राजेंद्र केरकर

सध्या म्हादईपासून खोतीगावपर्यंतचा पट्टा व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. उरलेला जो भाग म्हणजे बफर झोन आहे, तिथे लोक शेती आणि बागायती करू शकतात, अशी आश्वासक माहिती पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी दिली आहे.