रिक्शाचालकाकडून अपहरण करून महिलेवर अतीप्रसंगाचा प्रयत्न !

रिक्शाचालक प्रभाक पाटील (वय २२ वर्षे) आणि वैभव राजेश तरे (वय १९ वर्षे) यांनी महिलेला इच्छित स्थळी न सोडता ८ सप्टेंबरच्या रात्री १०.४५ वाजता तिचे अपहरण केले. तिला कोळेगावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन हत्याराचा धाक दाखवत तिच्यावर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

गोवा : दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाच्या हिंदु विद्यार्थ्यांसाठी मशीद दर्शन कार्यक्रम !

सरकारचे अनुदान घेणार्‍या शाळांना कोणत्याही धार्मिक कृतीमध्ये सहभागी होता येत नाही, असे असतांना हा उपक्रम कसा राबवण्यात येतो ? शाळा व्यवस्थापन असे कार्यक्रम राबवून काय साध्य करू इच्छिते ?

पाऊस न आल्यास दूधगंगा धरणातून पाणी सोडण्यात यावे ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्हापूर

या वर्षी पुरेसा पाऊस न आल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादन घेतले जात असून यामध्ये मका (मुरघास) घेतल्यास टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील गुरांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून चारा पुरवता येऊ शकेल.

पुणे येथील वाकड-बालेवाडी पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी जनहित याचिका प्रविष्ट !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी वर्ष २०१३ मध्ये या पुलाला संमती दिली होती. ३१ कोटी रुपये व्यय करून वर्ष २०१८-१९ मध्ये पूल बांधून पूर्ण झाला आहे

पुणे येथील लाचखोर वैद्यकीय अधिष्ठात्याची पालिका सेवेतून हकालपट्टी !

पुणे महापालिकेच्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया’चे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना १६ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांची आता महापालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

संस्कृत ऑलंपियाड परीक्षेत कु. मोक्षदा महेश देशपांडे हिला सुवर्णपदक !

‘संस्कृत प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर’ आणि शासकीय ज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या संस्कृत ऑलंपियाड २०२३ या परीक्षेत ९८ गुण मिळवून कु. मोक्षदाने सुवर्णपदक मिळवले आहे.

मुख्यमंत्री इंग्लंडला जाऊन ‘वाघनखे प्रत्यार्पण’ करारावर स्वाक्षरी करणार !

याच वाघनखांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्याशी दगाफटका करणार्‍या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.

एस्.टी. कर्मचार्‍यांचे ११ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण !

राज्यशासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास १३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप करण्याची चेतावणी एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संघटनेने दिली आहे.

द्रविडविरोधी विचारसरणीवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीला पोलीस अनुमती नाकारू शकत नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला एकाच विचारसरणीचे पालन करण्यास भाग पाडणे शक्य नाही आणि एखाद्या व्यक्तीला एखाद्या विचारधारेविषयी तिचे मते मांडण्याचा नेहमीच अधिकार असतो.

मंत्रालयातील पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती प्रदर्शनाला शेकडो भाविकांची भेट !  

श्री गणेश कला केंद्राच्या मूर्ती संतांच्या मार्गदर्शनानुसार आणि अथर्वशीर्षातील श्री गणेशाच्या वर्णनानुसार सिद्ध करण्यात आल्या आहेत.