गोवा : दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाच्या हिंदु विद्यार्थ्यांसाठी मशीद दर्शन कार्यक्रम !

विद्यार्थ्यांनी मशिदीत केले नमाजपठण !

दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालय

पणजी, १० सप्टेंबर (वार्ता.) – दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालय या सरकार अनुदानित शाळेच्या हिंदु विद्यार्थ्यांसाठी नुकतेच मशीद दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना मशिदीत नमाज पढण्याची सूचना करण्यात आल्यावर हिंदु विद्यार्थ्यांनी तेथे नमाजपठण केले.

‘मशीद दर्शना’च्या वेळी हिजाब घातलेल्या विद्यार्थिनी !

विद्यार्थ्यांनी नमाज पठण करण्यापूर्वी मशिदीतील नियमानुसार सर्व धार्मिक कृती केल्या आणि नमाजपठणानंतर मशिदीत छायाचित्रेही काढली. विद्यार्थिनींनी मशिदीत अंगावरील गणवेशाची ओढणी हिजाबप्रमाणे परिधान केली होती.

संपादकीय भूमिका

  • सरकारचे अनुदान घेणार्‍या शाळांना कोणत्याही धार्मिक कृतीमध्ये सहभागी होता येत नाही, असे असतांना हा उपक्रम कसा राबवण्यात येतो ?
  • शाळा व्यवस्थापन असे कार्यक्रम राबवून काय साध्य करू इच्छिते ? ‘मशीद दर्शना’च्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना नमाजपठण शिकवणे, विद्यार्थिनींकडून हिजाब परिधान करून घेणे यांद्वारे हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर करण्याचा छुपा हेतू कार्यरत आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?