संस्कृत ऑलंपियाड परीक्षेत कु. मोक्षदा महेश देशपांडे हिला सुवर्णपदक !

सुवर्णपदक स्वीकारतांना १.  कु. मोक्षदा देशपांडे

छत्रपती संभाजीनगर – ‘संस्कृत प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर’ आणि शासकीय ज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या संस्कृत ऑलंपियाड २०२३ या परीक्षेत ९८ गुण मिळवून कु. मोक्षदा महेश देशपांडे या युवा साधिकेने सुवर्णपदक मिळवले आहे. कु. मोक्षदा देशपांडे हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध शाळांमधून साधारणपणे २ सहस्र विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. संस्कृतदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्कृत भाषेची विद्यार्थ्यांना गोडी लागावी, यासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांचाही या वेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला ‘संस्कृत प्रतिष्ठान’चे डॉ. अजय निलंगेकर, शिक्षण महर्षी श्री. यज्ञवीर कवडे, उद्योजिका सौ. सुनीता देसरडा, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. (सौ.) रोहिणी कुलकर्णी आणि शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय संस्कृत विभाग प्रमुख डॉ. (सौ.) पंकजा वाघमारे उपस्थित होत्या.

विशेष : विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा हा संपूर्ण कार्यक्रम संस्कृत भाषेतून घेण्यात आला.