भारत आपल्या सन्मानासाठी नियंत्रणरेषाही ओलांडू शकतो ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

जम्मू/लेह – भारत आपल्या सन्मानासाठी नियंत्रणरेषाही ओलांडू शकतो, असे म्हणत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिलमधून पाकला चेतावणी दिली. ते २६ जुलै या दिवशी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने लडाखमधील द्रास येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वर्ष १९९९ मध्ये याच दिवशी भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानला जगातील सर्वांत कठीण रणांगणांपैकी एक असलेल्या द्रासमधून हुसकावून लावून विजय संपादन केला होता. या वेळी युद्धात देशासाठी वीरगती मिळालेल्या सैनिकांना संरक्षणमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे आणि एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनीही द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी सिद्ध रहाण्याचे आवाहन केले.

संपादकीय भूमिका 

पाकिस्तान आणि चीन यांच्या भारतविरोधी कारवाया पहाता सैनिकांनी नियंत्रणरेषा ओलांडण्याची हीच योग्य वेळ आहे, असेच भारतियांना वाटते !