मणीपूरमध्ये महिलेचा विनयभंग करणारा सैनिक निलंबित

इंफाळ (मणीपूर) – येथे एका किराणा मालाच्या दुकानात एका महिलेचा विनयभंग करणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाला निलंबित करण्यात आले आहे. २० जुलै या दिवशी घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. त्यानंतर या सैनिकावर कारवाई करण्यात आली. सतीश प्रसाद असे त्याचे नाव असून तो सीमा सुरक्षा दलात हवालादार म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

अशा वासनांधांना कठोर शिक्षा केली पाहिजे !