
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दिवसाचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. १ ऑगस्ट या दिवशी हा दौरा होणार असून या दौर्यात ते आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असून त्यानंतर ते लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला येणार आहेत. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच असणार आहे. दुसरा कार्यक्रम पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच पी.एम्.आर्.डी.ए.च्या प्रकल्पाचे भूमीपूजन हा असणार आहे. तसेच या कार्यक्रमांच्या ठिकाणीच त्यांची जाहीर सभा होणार असल्याने या निमित्ताने पुण्यात भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ असणार असल्याची चर्चा आहे.
सौजन्य टीव्ही 9
महापालिकेच्या ‘पंतप्रधान आवास योजने’चे घरवाटप, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रकल्प, तसेच पी.एम्.आर्.डी.ए.च्या आवास योजनेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर होणार आहे. तूर्तास हे कार्यक्रम अंतिम नसले, तरी प्रशासनाकडून या नियोजनानुसारच सिद्धता करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !
कृष्णा नदीपात्रात रासायनिक प्रदूषण नाही ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण
अमेरिकेने सर्वांत मोठ्या सैनिकी कमांडमधून ‘इंडो’ शब्द काढला !
महाबळेश्वर येथील हनुमान मंदिराचा मार्ग ‘द क्लब’ व्यवस्थापनाकडून खुला
गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन