आतंकवादावर निर्णायक कारवाई करणे आवश्यक ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादावर निर्णायक कारवाईसाठी भारतानेच पुढाकार घेऊन पाकला संपवणे आवश्यक आहे. ‘अन्य कुणाकडून ही कारवाई होईल’, अशी भ्रामक अपेक्षा न करता आता हे स्वतःचेच दायित्व असल्याचे लक्षात घेऊन भारतानेच हे करणे आवश्यक आहे !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यता मिळावी ! – ब्रिटन

ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारामध्ये भारत, जपान, जर्मनी, ब्राझिल आणि आफ्रिका या देशांना स्थायी जागा दिली पाहिजे, अशी मागणी केली. सध्या या परिषदेमध्ये केवळ ५ देश स्थायी सदस्य आहेत.

हरियाणा सरकार ४५ ते ६० वयोगटातील अविवाहितांना देणार २ सहस्र ७५० रुपये निवृत्तीवेतन !

जनसंवाद कार्यक्रमामध्ये एका ६० वर्षीय अविवाहित वृद्धाच्या मागणीवरून मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला.

डावे पक्ष राजकीय लाभासाठी समान नागरी कायद्याला हिंदु-मुसलमान वादाचे स्वरूप देत आहेत ! – काँग्रेसचा आरोप

काँग्रेसने दावा केला, की डावे पक्ष भाजपप्रमाणेच समाजात फूट पाडून हा कायदा लागू करण्यासाठी जातीय तणाव निर्माण करून ध्रुवीकरणाचा मार्ग अवलंबत आहेत.

टेक्सास (अमेरिका) येथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी १० सहस्र लोकांनी केले श्रीमद्भगवद्गीतेचे सामूहिक पठण !

‘योग संगीता ट्रस्ट, अमेरिका’ आणि ‘एस्.जी.एस्. गीता फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान्यांचे आक्रमण !

बलाढ्य अमेरिकेत भारतीय दूतावासावर परत परत आक्रमण केले जाते, हे अमेरिकेला लज्जास्पद ! भारताने भारतीय संपत्तीच्या रक्षणासाठी अमेरिकेवर दबाव आणणे आवश्यक आहे !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव इंदूर येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

हिंदूंच्या हलाखीच्या स्थितीवर ʻहिंदु राष्ट्रʼ हाच मार्ग !

‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीकारक यांच्यावर टीका करून गांधींच्या अहिंसेची प्रशंसा करणार्‍या हिंदूंची हलाखीची स्थिती झाली आहे. यात काय आश्चर्य ? यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन संस्‍थेच्‍या वतीने देशभरात ७२ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

महोत्‍सवाच्‍या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि सनातन संस्‍थेचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. गुरुपौर्णिमेच्‍या निमित्ताने अनेक साधकांनी भावाश्रूंसह गुरुचरणी कृतज्ञता व्‍यक्‍त केली.