संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यता मिळावी ! – ब्रिटन

न्यूयॉर्क (अमेरिका) – ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारामध्ये भारत, जपान, जर्मनी, ब्राझिल आणि आफ्रिका या देशांना स्थायी जागा दिली पाहिजे, अशी मागणी केली. सध्या या परिषदेमध्ये केवळ ५ देश स्थायी सदस्य आहेत. यात अमेरिका, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि रशिया यांचा समावेश आहे. प्रत्येक २ वर्षांनी या परिषदेतील १० देश अस्थायी सदस्य बनतात. भारताने मात्र या परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळण्याची मागणी केली आहे.