टेक्सास (अमेरिका) येथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी १० सहस्र लोकांनी केले श्रीमद्भगवद्गीतेचे सामूहिक पठण !

टेक्सास (अमेरिका) – येथील अ‍ॅलन ईस्ट सेंटरमध्ये ३ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीमद्भगवद्गीतेचे १० सहस्र लोकांनी सामूहिक पठण केले. या वेळी अनुमाने ७५० हून अधिक मंत्रांचे पठण करण्यात आले.


‘योग संगीता ट्रस्ट, अमेरिका’ आणि ‘एस्.जी.एस्. गीता फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेत पठणाचा कार्यक्रम होण्याची ही पहिलीच वेळ आहे.