इंदूर (मध्यप्रदेश) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव २ आणि ३ जुलै या दिवशी येथील भक्तवात्सल्याश्रमाच्या जवळ असलेल्या नवनीत गार्डन येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. या उत्सवाला देहली, वडोदरा, नाशिक, मुंबई, सांगली, कोल्हापूर, गोवा आदी ठिकाणचे भक्त उपस्थित होते.
२ जुलै या दिवशी गुरुपादुकांची पालखी आश्रमातून अन्नपूर्णा मार्गावरील दत्तमंदिराकडून कार्यक्रमस्थळापर्यंत काढण्यात आली. येथे महाप्रसादानंतर दुपारी ४ वाजता शितल ठुसे (नारायणगाव) यांचे समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या संत वेणाबाई यांच्या जीवनावर प्रवचन झाले. त्यानंतर कु. धनश्री जोशी (भुसावळ) यांनी भारूड सादर केले.
भारुडानंतर नित्यउपासना, आरती, महाप्रसाद यानंतर रात्री १० ते १ या वेळेत भजनाचा कार्यक्रम झाला.
३ जुलै या दिवशी, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८ वा सत्यनारायण पूजा, व्यास पूजा, गुरुपादुका पूजन, आरती, भजन पार पडले. त्यानंतर सर्व भक्तांनी गुरुपादुकांचे दर्शन घेतले.