साधकांची साधना होण्‍यासाठी अपार कष्‍ट घेणारे, साधकांना आपला अमूल्‍य सहवास देऊन आणि दिव्‍य अनुभूती देऊन घडवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या समवेत सुखासनावर बसण्‍याची चूक करणे आणि तरीही तेथून निघतांना गुरुदेवांनी प्रेमानेे पाठीवरून हात फिरवणे

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. राधा सुनील दळवी (वय ८ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. राधा सुनील दळवी ही या पिढीतील एक आहे ! ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली सातारा येथील कु. राधा दळवी (वय ८ वर्षे) ! सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला … Read more

भारतातील हिंदूंच्‍या धार्मिक भावनांची स्‍थिती जाणा !

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्‍या जवळ एका गोणीत गोमांस सापडले आहे. याची माहिती हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी येथे रस्‍ता बंद करून निदर्शने केली.

सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी हिंदु महिलेवर रात्रभर केला सामूहिक बलात्कार !

बांगलादेशमधील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेच हिंदूंवर अत्याचार करत असतांना भारत सरकार हिंदूंच्या सुरक्षेचे सूत्र बांगलादेश सरकारकडे उपस्थित का करत नाही ?

महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्‍या शाळांमध्‍ये महाराष्‍ट्र शासन त्‍यांच्‍या कार्याचे संग्रहालय उभारणार !

राज्‍यातील अशा १३ ऐतिहासिक गावांतील शाळांची शासनाने निवड केली आहे. या शाळांमध्‍ये संबंधित राष्‍ट्रपुरुषांच्‍या कार्याची माहिती सांगणारी संग्रहालये उभारण्‍यात येणार आहेत. यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी शासनाने घोषित केला आहे.

श्री विठ्ठलभक्‍ती बडव्‍यांकडून शिका अन् श्री विठ्ठलाची अपकीर्ती थांबवा ! – गणेश लंके, अध्‍यक्ष, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर संरक्षक कृती समिती, पंढरपूर

अफझलखान, तसेच परकीय आक्रमणे यांपासून विठ्ठलमूर्तीचे संरक्षण, पावित्र्य जतन करून ठेवणारे बडवेच होते. विठ्ठलाची तुलना राजकीय व्‍यक्‍तीशी करणे, हे संतापजनक आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने निषेध करायला हवा होता.

मुंबईत चुनाभट्टी येथे भीषण अपघात, एकाचा मृत्‍यू !

चुनाभट्टी येथे मुंबई ईस्‍टर्न एक्‍सप्रेस हायवेवरून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने ४ वाहनांना धडक दिली. यामध्‍ये एकाचा जागीच मृत्‍यू झाला असून ३ जण गंभीर घायाळ आहेत.

जैन मुनी हत्‍येचे अन्‍वेषण सीबीआयकडे द्या ! – अभय पाटील, आमदार, भाजप

चिक्‍कोडी तालुक्‍यातील हिरेकोडी नंदीपर्वत जैन आश्रमाचे १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्‍या हत्‍येच्‍या अन्‍वेषणात पोलिसांकडून सत्‍य समोर येत नाही. त्‍यामुळे हे अन्‍वेषण सीबीआयकडे (केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणा) द्यावे, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे भाजपचे आमदार अभय पाटील आणि माजी आमदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

पर्यावरणद्रोहींवर कारवाई करण्‍यासाठी ठाकरे पक्षाची वन विभागासमोर निदर्शने!

गांधीनगर बाजारपेठेतील जे लोक दुकानासमोरील वृक्ष कचरा पेटवून नष्‍ट करतात आणि जे लोक आम्‍ल टाकून वृक्ष नष्‍ट करतात, अशा पर्यावरणद्रोही लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच जे वृक्ष सध्‍या डौलाने उभे आहेत, त्‍यांची गणना करून त्‍यावर क्रमांक टाकून त्‍यांच्‍या संवर्धनाचे दायित्‍व निश्‍चित करण्‍यात यावे, या मागणीसाठी ठाकरे पक्षाच्‍या वतीने वन विभागासमोर निदर्शने करण्‍यात आली.

शरद पवार यांना ‘विठ्ठल’ संबोधणे अयोग्‍य !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि अन्‍य आमदार यांनी पक्षात बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. या वेळी मंत्रीपदाची शपथ घेतांना छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘आमचा विठ्ठल’ असा केला होता.