६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. राधा सुनील दळवी (वय ८ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. राधा सुनील दळवी ही या पिढीतील एक आहे !

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली सातारा येथील कु. राधा दळवी (वय ८ वर्षे) !

कु. राधा दळवी
सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

कु. राधाचा सत्‍कार करतांना सौ. माधुरी प्रकाश दीक्षित

१. सौ. अमृता दळवी (कु. राधाची आई), सातारा

सौ. अमृता दळवी

१ अ. गर्भारपण

१ अ १. ‘गरोदरपणी ग्रंथ वाचन करतांना बाळ सर्व ऐकत असून त्‍याचे ध्‍यान लागले आहे’, असे वाटणे : गरोदरपणातील ७ – ८ व्‍या मासात मी ‘नाथ माझा भक्‍तराज’, ‘प्रवचने’, ‘नवनाथ’, ‘महाभारत’ इत्‍यादी अनेक ग्रंथांचे वाचन केले. गर्भातील बाळाला ग्रंथाचे वाचन ऐकायला पुष्‍कळ आवडायचे. त्‍या वेळी ‘ती सर्व ऐकत आहे’, असे मला वाटायचे. ग्रंथ वाचेपर्यंत बाळ शांत असायचे. त्‍या वेळी ‘बाळाचे ध्‍यान लागलेले आहे’, असे मला वाटायचे.

आ. गरोदरपणात यजमान (श्री. सुनील दळवी), सासूबाई (सौ. लक्ष्मी शिवाजी दळवी, वय ५५ वर्षे) आणि सासरे (श्री. शिवाजी खंडू दळवी, वय ६७ वर्षे) यांनी माझ्‍याकडून नामजप करून घेतला.

१ आ. जन्‍माच्‍या वेळी

१. माझे गरोदरपणाचे ९ मास पूर्ण झाल्‍यावर माझ्‍या पोटात दुखू लागले. आम्‍ही रात्री रुग्‍णालयात निघालो. तेव्‍हा ‘मी जणू श्रीकृष्‍णाच्‍या रथात बसले आहे’, असे मला वाटत होते.

२. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘माझे शस्‍त्रकर्म (सिझेरियन) करावे लागेल. त्‍या वेळी मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना धावा करत होते. तेव्‍हा आधुनिक वैद्य मला प.पू. गुरुमाऊलींसारखेच (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यासारखे) दिसत होते.

१ इ. जन्‍मानंतर

१. बाळाचा नामकरण विधी झाला आणि तिचे नाव राधा ठेवले.

श्री. सुनील दळवी

१ ई. वय जन्‍म ते ७ वर्षे

१ ई १. सात्त्विकतेची ओढ

अ. घरी दैनिक ‘सनातन प्रभात’ आल्‍यावर ती नेहमी प्रथम नमस्‍कार करते.

आ. तिला गायींविषयी पुष्‍कळ प्रेम आहे.

१ ई २. देवाची ओढ

१. राधा दोन-अडीच वर्षांची असतांना सर्व देवतांची चित्रे ओळखत असे.

२. आम्‍ही एकदा गोंदवले येथे गेलो होतो. तिथे राधा म्‍हणाली, ‘‘मी हे सर्व आधी पाहिले आहे’’ आणि ती स्‍वतःच ‘श्रीराम’, असे म्‍हणू लागली. तेव्‍हा आम्‍हालाही आश्‍चर्यच वाटले.

३. राधाला मंदिरात जायला आणि गडकिल्ले पहायला पुष्‍कळ आवडतात.

१ ई ३. श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव

अ. राधाकडून काही चूक झाली, तर ती लगेच गुरुदेवांची क्षमायाचना करते.

आ. तिने गुरुदेवांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या वेळी गुरुदेवांसाठी पालखी सिद्ध केली होती.

इ. राधाला ‘तुझ्‍या हृदयात कोण कोण आहे ?’, असे विचारल्‍यावर ती लगेच सांगते, ‘‘श्रीकृष्‍ण आणि परम पूज्‍य !’’

ई. घरात एखादा वाईट प्रसंग घडणार असेल, तर ती नेहमी तिच्‍या आजी-आजोबांना सांगते, ‘‘तुम्‍ही घाबरू नका. श्रीकृष्‍ण आणि परम पूज्‍य आपल्‍या समवेत आहेत ना !’’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपाशीर्वादामुळेच आम्‍हाला असे सात्त्विक बाळ लाभले. यासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. सौ. लक्ष्मी दळवी (कु. राधाची आजी (वडिलांची आई, वय ५५ वर्षे), सातारा

२ अ. देवाची ओढ : ‘कु. राधा लहानपणापासून देवाला हात जोडून नमस्‍कार करते. ती देवाला प्रार्थना करते आणि देवपूजेसाठी फुलेही स्‍वतःच आणते. ती मारुति स्‍तोत्र आणि गणपति स्‍तोत्र म्‍हणते.

२ आ. सात्त्विकतेची ओढ : राधाला सात्त्विक आणि सुती कपडे परिधान करायला आवडतात.

२ इ. तत्त्वनिष्‍ठ : घरात इतरांची, तसेच तिच्‍या आई-बाबांची चूक झाली, तर ती लगेच त्‍याची जाणीव करून देते आणि त्‍यांना देवासमोर उभे राहून क्षमा मागण्‍यास सांगते.

२ ई. धर्माचरण करणे : राधाला तिचा वाढदिवस केक कापून साजरा करायला आवडत नाही. तसेच वाढदिवसाला कोणी केक आणला, तर ती सर्वांना ‘केक कापू नका’, असे सांगते. जर तिला कोणी विचारले की, केक का कापायचा नाही ? तेव्‍हा ती सांगते, ‘‘वाढदिवस केक कापून आणि मेणबत्ती विझवून साजरा न करता तुपाचा दिवा लावून आणि औक्षण करून साजरा करायचा’, असे आमच्‍या गुरुदेवांनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आम्‍हाला सांगितले आहे.’’

२ उ. धर्माभिमान

१. ती स्‍वतः बेकरीतील पदार्थ कधीच खात नाही. ती बेकरीतील ‘पाव आणि टोस्‍ट’, हे पदार्थ खरेदी करण्‍यास सक्‍त मनाई करते. ‘ते पदार्थ  अन्‍य धर्मीय बनवतात’, असे ती म्‍हणते.

२. आम्‍ही तिला बांगड्या किंवा कपडे घेण्‍यास चुकून  अन्‍य धर्मियांच्‍या दुकानात गेलो, तर ती लगेच जाणीव करून देते आणि त्‍यांच्‍याकडून कुठलीच वस्‍तू खरेदी करत नाही.

२ उ ३. राधा पुढील घोषणा नियमित देते.

अ. छत्रपती शिवाजी महाराज की जय !

आ. जिजामाता की जय !

इ. झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो !

२ ऊ. संतांप्रती भाव : ‘आमच्‍या घरी संत येणार असतील, तर ते तिला आधीच समजते’, असे मला वाटते. त्‍या दिवशी ती देवपूजा नेहमीपेक्षा वेगळी करते.

२ ए. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव : घरात कोणी नवीन कपडे किंवा नवीन वस्‍तू आणली, तर राधा आधी गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अर्पण करते.

२ ऐ. स्‍वभावदोष : अबोल, इतरांशी लगेच बोलत नाही, हट्टीपणा’

(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक २१.७.२०२२)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक