शरद पवार यांना ‘विठ्ठल’ संबोधणे अयोग्‍य !

अजित पवार गटाला भाजपच्‍या आचार्य तुषार भोसले यांचे खडे बोल !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि भाजपचे आचार्य तुषार भोसले

मुंबई – राष्‍ट्रवादी पक्षाचे अध्‍यक्ष शरद पवार यांना ‘विठ्ठल’ संबोधणे थांबवा, अन्‍यथा आम्‍ही रस्‍त्‍यावर उतरू. एखाद्या राजकीय नेत्‍याला ‘विठ्ठला’ची उपमा देणे शोभते का? असे खडे बोल भाजपचे आध्‍यात्‍मिक आघाडीचे प्रदेशाध्‍यक्ष तुषार भोसले यांनी अजित पवार गटाला ट्‍वीट करून सुनावले आहेत.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि अन्‍य आमदार यांनी पक्षात बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. या वेळी मंत्रीपदाची शपथ घेतांना छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘आमचा विठ्ठल’ असा केला होता.