जैन मुनी हत्‍येचे अन्‍वेषण सीबीआयकडे द्या ! – अभय पाटील, आमदार, भाजप

पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार अभय पाटील (मध्‍यभागी), तसेच अन्‍य

बेळगाव – चिक्‍कोडी तालुक्‍यातील हिरेकोडी नंदीपर्वत जैन आश्रमाचे १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्‍या हत्‍येच्‍या अन्‍वेषणात पोलिसांकडून सत्‍य समोर येत नाही. त्‍यामुळे हे अन्‍वेषण सीबीआयकडे (केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणा) द्यावे, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे भाजपचे आमदार अभय पाटील आणि माजी आमदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

आमदार अभय पाटील पुढे म्‍हणाले, ‘‘अन्‍वेषणाची प्रक्रिया पहाता जैन समाजाला न्‍याय मिळण्‍याची शक्‍यता नाही. कामकुमारनंदी महाराज यांची हत्‍या आर्थिक व्‍यवहारातून झाल्‍याचे पोलीस सांगतात. सर्वसंग परित्‍याग केलेले महाराज आर्थिक व्‍यवहार करतात म्‍हणणे चुकीचे आहे. अटक केलेल्‍या दोन्‍ही आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असतील, तर दोघांचीही नावे घोषित करण्‍यात पोलिसांना काय अडचण होती ? यात मुसलमान आणि हिंदु दोघांना अटक झाली असेल, तर केवळ हिंदु आरोपीचेेच नाव का घोषित केले ? मुसलमान आरोपीचे नाव का लपवले? पोलीस सरकारच्‍या दबावाखाली येऊन मुख्‍य मुसलमान आरोपीला वाचवण्‍याचा प्रयत्न करत आहेत का ? यातून सरकार मुसलमान समाजाचे रक्षण करत आहे का ? असा संशय येतो.

सुवर्ण सौधसमोर आंदोलन करणारे आंदोलक

जैन मुनी बेपत्ता झाल्‍याचे आश्रम समितीच्‍या लोकांनी पोलिसांना सांगितल्‍यावर प्रारंभी तक्रार नोंदवून न घेता ‘आम्‍ही मुनींचा शोध घेतो, तुम्‍हीही शोध घ्‍या, असे पोलिसांनी का सांगितले ? तक्रार नोंदवून घेऊन शोधकार्य का चालू केले नाही ? राज्‍यात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच, निकालाच्‍या दिवशीच बेळगावात ‘पाकिस्‍तान झिंदाबाद’च्‍या घोषणा देण्‍यात आल्‍या. नुकतीच एका जिमचालक हिंदु तरुणाला मुसलमान समुदायाने बेदम मारहाण केली. आता जैन मुनींच्‍या हत्‍या प्रकरणाचा निःपक्ष तपास न करता जैन मुनींचे आणि जैन समाजाचे नाव खराब करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. ज्‍या स्‍वामीजींचे साधे बँक खातेही नाही, ज्‍यांनी कपड्यांचाही त्‍याग करून निर्वाणवृत्ती स्‍वीकारली आहे, त्‍यांच्‍या हत्‍याराचे नाव काँग्रेस सरकार का लपवून ठेवत आहे ?

चिक्‍कोडीत जैन समाज मूक आंदोलन करणार आहे. भाजप नेत्‍यांशी चर्चा करून विधानसभेतही आवाज उठवणार आहे.

कामकुमारनंदी महाराज यांच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ सुवर्ण सौधसमोर जैन बांधवांचे रस्‍ता बंद आंदोलन !

सुवर्ण सौधसमोर आंदोलन करणारे आंदोलक

कामकुमारनंदी महाराज यांच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ जैन बांधवांनी सुवर्ण विधानसौध समोर पुणे-बेंगळुरू महामार्गावर रस्‍ता बंद आंदोलन केले. या वेळी जैन मुनी, स्‍वामीजी यांना पोलीस संरक्षण देण्‍याची मागणी केली. हलगा गावचे सिद्धसेन महाराज यांच्‍या नेतृत्‍वाखाली झालेल्‍या या आंदोलनात आबालवृद्धांसह जैन समाजाचे नेते आणि सहस्रो लोक सहभागी झाले होते. जैन धर्माचे ध्‍वज घेऊन आंदोलकानी जोरदार घोषणा देत जैन मुनींच्‍या निर्घृण हत्‍येचा निषेध केला. ‘अहिंसा परमो धर्म की जय’,  ‘आम्‍हाला न्‍याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा दिल्‍या.

या प्रसंगी श्‍वेतांबर जैन समाजाचे नेते राजेंद्र जैन म्‍हणाले, ‘‘विजेचा शॉक देऊन मुनींच्‍या मृतदेहाचे तुकडे नादुरुस्‍त कूपनलिकेत फेकून देणे यांसारखी निर्घृण हत्‍या या देशात झाली नसावी. या कृत्‍यांत गुंतलेल्‍यांना कठोर शिक्षा देण्‍यात यावी.’’

कामकुमारनंदी महाराज पंचतत्त्वात विलीन !

हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाशेजारील शेतात भक्‍तांच्‍या अलोट जनसागराच्‍या उपस्‍थितीत जैन धर्माच्‍या विधींप्रमाणे कामकुमारनंदी महाराज यांच्‍यावर अंतिम संस्‍कार करण्‍यात आले.