सिंधुदुर्ग : महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रात बिघाड झाल्याने २५ गावे अंधारात !

येथे झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली.

सिंधुदुर्ग : तेंडोली येथे उज्ज्वला नदीवर असलेल्या पुलावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजवले !

पावसाळ्यात पुलावर पडलेले खड्डे ग्रामस्थांना बुजवावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! 

गोवा : न्यायालयात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा व्याघ्रक्षेत्र घोषित करा !

लोकभावनेचा विचार करून उच्च न्यायालयाने सरकारला ३ मासांत म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी.

गोवा : लैंगिक अत्याचार करणार्‍या युसुफला महाविद्यालयीन युवतीने तोंडावर ‘स्प्रे’ आणि मिरची पूड मारून दिला यथेच्छ चोप !

अन्य युवती आणि महिला यांनी यातून बोध घेऊन स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !

अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध ! – शॉर्न क्लार्क

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ‘सी-२०’ परिषदेत संशोधनाची माहिती सादर !

देवाच्या कृपेचे अद्वितीय महत्त्व !

‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापनावर कारवाई करण्यात विलंब नाही ! – धर्मरावबाबा आत्राम, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

याविषयी मंत्री आत्राम म्हणाले की, ‘औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४०’ या कायद्यांतर्गत नियम १९४५ मधील प्रावधानांचे उल्लंघन केल्यास त्याविषयी आस्थापनाकडून हानी भरपाई घेण्याची तरतूद नाही.

पुणे येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बी.एस्.सी.च्या (भौतिकशास्त्र) तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या ओम कापडणे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मंदिरांत रात्री ११ पर्यंत भजन आणि कीर्तन करण्यास अनुमती मिळावी ! – ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे

महाराष्ट्रातील मंदिरांत रात्री १० नंतर भजन आणि कीर्तन करण्यास पोलीस प्रशासन अडवणूक करत आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळ यांना रात्री ११ वाजेपर्यंत भजन अन् कीर्तन करण्यासाठी शासनाने अनुमती द्यावी