कुडाळ – तालुक्यातील तेंडोली येथील उज्ज्वला नदीवर असलेला पूल पावसातील पुराच्या पाण्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या पुलावर मोठे खड्डे पडले असल्याने तो वाहतुकीस धोकादायक बनला होता. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती होती. अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन सिमेंट काँक्रिट घालून हे खड्डे बुजवले.
या वेळी सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच संदेश प्रभु, माजी सरपंच भाऊ पोतकर, सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष विजय प्रभु, ग्रामपंचायत सदस्य आकाश मुननकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून हे काम करण्यात आले. या वेळी सुनील तेंडोलकर, अरुण राऊळ, नवसू तेंडोलकर, संतोष तेंडोलकर, रवि तेंडोलकर, उत्तम तेंडोलकर, सिद्धेश तेंडोलकर, सदानंद राऊळ आदी ग्रामस्थांनी हे खड्डे बुजवले.
संपादकीय भूमिकापावसाळ्यात पुलावर पडलेले खड्डे ग्रामस्थांना बुजवावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! |