पुणे – फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बी.एस्.सी.च्या (भौतिकशास्त्र) तिसर्या वर्षात शिकणार्या ओम कापडणे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मूळचा नाशिकचा असणार्या ओम याने पुणे येथील रहात असलेल्या वडारवाडी येथील ‘विष्णुकुंज वसतीगृहा’त गळफास घेतला. ही माहिती मिळताच ‘हेल्परायडर्स संघटने’च्या कार्यकर्त्यांनी ओम याला खासगी रुग्णालयात नेले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी चिठ्ठी आढळून आलेली नाही. ओमने हे पाऊल का उचलले, याचे अन्वेषण चालू आहे. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पुणे येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या !
पुणे येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या !
नूतन लेख
देहलीमध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक !
नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘भगवा रक्षक’च्या कार्यकर्त्यांच्या प्रबोधनामुळे श्री गणेशमूर्तींचे १०० टक्के विसर्जन !
पुणे ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ला श्री गणेशोत्सव काळात १९ कोटी रुपयांचे उत्पन्न !
पुणे येथे ‘२० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करून देतो’, असे सांगून महिलेची फसवणूक !
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !
कोंढवा (पुणे) येथे ४ देशी गायी-बैल यांची कत्तलीसाठी वाहतूक करणार्या वाहनचालकावर गुन्हा नोंद !