रामनाथ (अलिबाग) – मुंबई-गोवा महामार्गाची सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहाणी केली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल, तर डिसेंबरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात काम करता येण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१. मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम १२ वर्षे रखडले आहे. डांबरीकरणाच्या माध्यमातून हा रस्ता केला जाणार होता; मात्र आता काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.
२. पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर अशा दोन टप्प्यांत काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईल. पळस्पे ते कासू टप्प्यातील १२ किलोमीटरच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून गणेशोत्सवापूर्वी उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. कासू ते इंदापूर मार्गाच्या कामात नवीन तंत्रज्ञान वापरले जाईल.
संपादकीय भूमिकावर्षानुवर्षे महामार्गाचे काम रखडले जाणे, हे अनेक वर्षे त्यात भ्रष्टाचाराचे पाणी मुरत असल्यामुळेच, असेच जनतेला वाटते. |