पुणे येथे पोलिसांकडून कोयता गँग टोळीची महाविद्यालयात धिंड !

पुणे येथे पोलिसांकडून कोयता गँग टोळीची महाविद्यालयात धिंड !

पुणे – मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँग सक्रिय झाली आहे. सदाशिव पेठ येथे महाविद्यालयीन तरुणीवर एकतर्फी प्रेमातून तरुणांनी कोयत्याने आक्रमण केले होते. त्यानंतर येथील नामांकित महाविद्यालयामध्येही विद्यार्थ्यांना सुरा आणि कोयता घेऊन काही गुंडांनी धमकावले होते. विद्यार्थ्यांना धमकावणार्‍या टोळीवर पोलिसांनी कारवाई करून त्यांची महाविद्यालयामध्येच धिंड काढली. या गुंडांमध्ये ९ जण असून त्यातील दोघेजण याच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना धमकावणे, तसेच त्यांच्याकडून पैसे मागणे असे कृत्य ही टोळी करत होती. महाविद्यालयात त्यांची वरात काढून पोलिसांनी धडा शिकवला आहे.

संपादकीय भूमिका :

कोयता गँग सिद्धच व्हायला नको, असा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?