‘ना टायर्ड हूँँ, ना रिटायर्ड हूँ ।’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

नाशिक – मोरारजी देसाई ८४ व्या वर्षी देशाचे पंतप्रधान होते. वय होते; परंतु तुम्ही प्रकृती चांगली ठेवली, तर वयही साथ देते. ते ज्या जोमाने काम करायचे, तो अनुभव थक्क करणारा होता. याप्रमाणे मीसुद्धा ‘ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ ।’, हे अटलबिहारी वाजपेयी यांचे शब्द वापरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी त्यांची प्रतिक्रिया नाशिक येथे व्यक्त केली. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्हाला निवृत्त व्हायला सांगत आहेत, त्यावर काय सांगाल?’, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्या वेळी त्यांनी वरील विधान केले.