सिंधुदुर्ग : नेमळे ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखली !

अपघात टाळण्यासाठी प्रशासन काही करत नाही; म्हणून जनतेला आंदोलन करावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद ! जनतेने आंदोलन केल्यावर प्रशासनाकडून केवळ आश्वासन नको, तर तातडीने ठोस कृती अपेक्षित आहे !

गोवा : उकाड्यामुळे शाळा एक आठवडा पुढे ढकलण्याची काही पालकांची मागणी

पालकांच्या मते, ‘‘पालकांनाच उकाडा असह्य होत असतांना पाल्यांनाही अशा वातावरणात शिकणे कठीण होणार. सध्याचे दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षाही अधिक असते. यामुळे सरकारने शाळा एक आठवडा विलंबाने चालू करावी.’’

पाश्चात्त्य आणि भारतीय संगीत अन् नृत्य

‘पाश्चात्त्य देशांत गायन आणि नृत्य केवळ सुखासाठी करतात. याउलट भारतात संगीत आणि नृत्य साधनेचे प्रकार म्हणून ६४ कलांच्या अंतर्गत होते. त्यामुळे संगीत आणि नृत्य साधनेमध्ये ध्यानाप्रमाणे स्थिर न बसताही, म्हणजे गातांना आणि नृत्य करतांना ध्यान लागते ! भक्तीगीते गातांना किंवा समवेत नृत्य करतांना भावही जागृत होतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हुब्बळ्ळी आणि मंगळुरू (कर्नाटक) येथे हिंदू एकता दिंडी !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हुब्बळ्ळी आणि मंगळुरू येथे हिंदू एकता दिंडीचा उपक्रम घेण्यात आला.

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सिंधी समाजाचा मोर्चा !

२७ मे या दिवशी उल्हासनगर प्रभात गार्डन कँप ५ जवळ राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलतांना ‘जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाला कुत्र्यांची उपमा दिली होती’, असा आरोप त्यांच्यावर आहे.

सनातनचा साधक कु. शिवम कावरे याला १० वीत ९२.४० टक्के !

मी नियमितपणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना प्रार्थना अणि कृतज्ञता व्यक्त करत होतो. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे हे यश प्राप्त झाले असून यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.

दुर्धर, गंभीर शस्त्रक्रियांमध्ये सामान्यांना दिलासा देण्यासाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’ ! – मंगेश चिवटे, विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष

या कक्षाद्वारे गरजूंना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’ दिला जातो. २५ पेक्षा गंभीर आजारांसाठी ५० सहस्र ते २ लाखांपर्यंत साहाय्य देण्यात येते. यात कर्करोग, अवयव प्रत्यारोपण, हृदयविकार, रस्ते अपघात यांचा प्रमुख समावेश आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन सुलोचनादीदी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा !

प्रत्येक राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र तर नाही ना, याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने केंद्रीय स्तरावरील चौकशी समिती नेमावी;

कु. आर्य नाईक यास १२ वीत ९१.६७, तर कुमारी संजना कुलकर्णी हिला ९०.३३ टक्के

१२ वीच्या परीक्षेमध्ये पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !