ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार !

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर ५ जून या दिवशी दादर येथील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सुलोचनादीदी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन सुलोचनादीदी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी ‘सुलोचनादीदी यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली. चित्रपटसृष्टीतील त्या मूर्तीमंत वात्सल्य होत्या. त्यांनी साकारलेली ‘आई’ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायेची पखरण करणार्‍या वात्सल्यमूर्ती हरपल्या’, असे मत व्यक्त केले.