धुळे येथे २ ठिकाणी आणि नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी !
नंदुरबार/ धुळे – धुळे शहर, दोंडाईचा (धुळे) आणि नंदुरबार येथे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे ‘हिंदु मुलींची हत्या करणार्या लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा’ आणि ‘लव्ह जिहादविरोधी कायदा करा’, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. नंदुरबार येथे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना, दोंडाईचा (धुळे) येथे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना, तर धुळे येथे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त कैकाने यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, लव्ह जिहादच्या केवळ २-३ घटना नसून देशभरात अशा घटनांची मालिका चालू आहे. या घटना अतिशय सुन्न करणार्या आणि देशभरातील युवतींमध्ये दहशत निर्माण करणार्या आहेत. या घटनांतून लव्ह जिहादींची वासनांधता, क्रूरता आणि विकृत मानसिकता दिसून येते. या घटनांमुळे लोकांमध्ये संतापाचा उद्रेक होत आहे. प्रत्येक राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र तर नाही ना, याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने केंद्रीय स्तरावरील चौकशी समिती नेमावी; ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी; ‘लव्ह जिहाद’साठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांचीही शासनाने चौकशी करून त्यांचे मॉड्यूल उद्ध्वस्त करावे.
उपस्थित धर्मप्रेमी
नंदुरबार – अधिवक्ता सुमित परदेशी, अधिवक्ता दीपक पाटील, सर्वश्री जितेंद्र मराठे, मयूर चौधरी, अमोल ठाकरे, आकाश गावित, हर्षल देसाई, भूषण पाटील, अविनाश लोणारी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि अन्य भगिनी कार्यकर्त्या
धुळे – सर्वश्री किशोर अग्रवाल, पियुष खंडेलवाल, गौरव जाधव, हिमांशू चौधरी, भावेश कर्ण, उज्ज्वल चौधरी, दिनेश वाघ, हर्षल वानी, तसेच कु. श्रुती शिरसाट, कु. गौरी कर्ण आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल वानखेडे हे उपस्थित होते.
दोंडाईचा येथे विश्व हिंदु परिषद, रा.स्व. संघ, शिवसेना, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते, तसेच रणरागिणी शाखेच्या प्रतिनिधी आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.